ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाईन गुडा शाळेत शिक्षण परिषद तथा सत्कार सोहळा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजुरा पंचायत समिती अंतर्गत भेंडवी व मानोली केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद जि प शाळा लाईन गुडा येथे नुकतीच पार पडली.

 या शिक्षण परिषदेत दोन्ही केंद्रातील निपुण शाळा केलेल्या शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थानी मा.मनोज गोरकार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा हे होते तर श्री सावंन चालखुरे शिक्षण विस्तार अधिकारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून प्रा विजय आकनुरवार ,सेवानिवृत्त उपप्राचार्य ,तसेच श्री कृष्णा बत्तुलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर उपस्थित राहून शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद तथा सत्कार सोहळ्याचे आयोजन दोन्ही केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संजय त्रिपतीवार यांनी केले दोन्ही केंद्रातून 6शाळा निपुण झालेल्या असून त्या शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक सर्वश्री श्री आनंद काळे मुख्याध्यापक, श्री पिंकू उपरे सहाय्यक शिक्षक लाईनगुडा.श्री अनिल मते मुख्याध्यापक, श्री किरण दादाजी लांडे सहाय्यक शिक्षक कवडगोंदी. श्री संतोष तिडके मुख्याध्यापक व श्री गणपत येंचेवाड सहाय्यक शिक्षक सालेगुडा.श्री विष्णू बडे मुख्याध्यापक, शिवाजी पवार सहाय्यक शिक्षक नोकरी बु.श्री सुरेश कांबळे मुख्याध्यापक व श्री अशोक जाधव सहाय्यक शिक्षक हिरापूर श्री संतोष जुलमे मुख्याध्यापक व श्री सत्यपाल जाधव कंत्राटी शिक्षक ईसापुर यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व पुष्पमालेने सत्कार करण्यात आला. तसेच या 2024 25 सत्रामध्ये ज्या शिक्षकांनी आपले वर्ग निपुण केले अशाही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यात कुमारी राजश्री मुंडे सहाय्यक शिक्षिका वरझडी श्री किशोर मून सहाय्यक शिक्षक मुरलीगुडा,श्री गोरे सहाय्यक शिक्षक सोनापूर श्री संतोष लांजेकर सहाय्यक शिक्षक फुगडी पठार श्री वनपाल सोयाम सहाय्यक शिक्षक मानोली खुर्द .

 2024 -25 या सत्रात मान. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धेत राजुरा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा संवर्गातून अत्यंत कमी पट संख्येची 15 पट असलेली छोटीशी पण सुंदर अशी शंभर टक्के आदिवासी बहुल असलेली दुर्गम भागातील लाईनगुडा शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला: त्याबद्दल त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंद काळे सर व सहाय्यक शिक्षक श्री पिंकू उपरे सर यांचा केंद्रप्रमुखाच्या वतीने माननीय गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांचे शुभ हस्ते शाल श्रीफळ- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

शिक्षण परिषदेची वैशिष्ट्ये

 सर्व शिक्षक गणवेशात व ओळखपत्रासह उपस्थित होते.

 गुणवत्ता वाढीसाठी नियोजन अंमलबजावणी व तिचे सातत्य ठेवण्याचं सर्व शिक्षकांनी ठरविले शिष्यवृत्ती परीक्षा नवरत्न स्पर्धा परीक्षा यासाठी सातत्याने सराव घेऊन यशस्वीता गाठण्याचा संकल्प करण्यात आला

 परिषदेत केंद्रप्रमुखाचे वतीने लाजाळूचे रोपटे शाळांना भेट देण्यात आले.

 शिक्षकांना जि.प.ने ठरवून दिल्याप्रमाणे केवळ प्रमाणपत्र न देता सन्मानचिन्ह ही देण्यात आले गावकऱ्यांनी उत्तम असं भोजन तयार करून सर्व शिक्षकांना व उपस्थितांना मेजवानी उपलब्ध करून दिली.

 श्री बत्तुलवार सरांनी आपल्या भाषणातून सर्व शिक्षकांनी विद्यार्थी शी आत्मीयतेने व समरस होऊन वागण्याची गरज आहे, विद्यार्थी हे भावी देशाचे आधारस्तंभ असून त्यांच्या अंगी मूल्य रुजवणे फार गरजेचे आहे व यासाठी विद्यार्थ्यांसमोर आपला आदर्श ठेवणे गरजेचे आहे असे नमूद केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गोरकार सर गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांनी ध्येय निश्चित करून वर्षभराच्या कामकाजाचे नियोजन करून नवरत्न स्पर्धा, शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा,नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा, एकलव्य विद्यालय प्रवेश परीक्षा इत्यादींच नियोजन करून सराव व सातत्य ठेवण्याचे आवाहन करून पुढील सत्रात शंभर टक्के शाळा निपुण करण्याबाबत आवाहन केले व येणाऱ्या सत्रासाठी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. संमेलनात गावचे सरपंच श्री रमेश मडावी, श्री रामदास कुरसंगे ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष, श्री अमोल कुरसंगे, श्री जंगू कुरसंगे, मानकू कन्नाके कर्णु मडावी,लताबाई नैताम, संजीवनी कुडसंगे मोहपत कुरसंगे, सौ लताबाई आत्राम,सौ पार्वता कुड मेथे, मंजुषा सुरपाम ई. व्यवस्थापन समिती सदस्य तथा महिला उपस्थित राहून शिक्षण परिषद तथा सत्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

  कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन श्री पिंकू उपरे सहाय्यक शिक्षक लाईनगुडा यांनी केले. वंदे मातरम या राष्ट्रगानाने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये