ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृंदावन नगरीत रासेयो व पसेयो विद्यार्थ्यांचे वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर – गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूरच्या राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षदिंडी व वृक्षरोपण हा कार्यक्रम घेण्यात आला.

          या कार्यक्रमाला महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम, सेवानिवृत्त प्राचार्या स्मिता चिताडे, सेवानिवृत्त उपप्रचार्य विजय आकनुवार, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रदिप परसुटकर, पसेयो कार्यक्रम अधिकारी सचिन भैसारे, प्रशांत पवार, आशिष देरकर, सुधीर थिपे, नरेंद्र हेपट, अमित देवलवार, सुभाष खुजे, विजय बोरकुटे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

          शाळेपासून वृक्षदिंडी गडचांदूर येथील वृंदावननगरपर्यंत काढण्यात आली व वृक्षारोपण करुन संरक्षण कठडे लावण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये