ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुसरबिड येथील अंगणवाडी गैरवापर बाबत शिवानंद सांगळे २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू करणार उपोषण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दुसरबिड येथे वार्ड क्र ६ मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग मार्फत अंगणवाडी चे बांधकाम २०१२ मध्ये पूर्ण झाले असून सुद्धा अद्याप तिथे अंगणवाडी सुरू झाली नाही त्या इमारती मध्ये गावातील राजकीय पुढारी भैय्या देशमुख उर्फ सचिन पवार यांनी खाजगी गोडाऊन म्हणून वापर करीत असून याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दुसरबीड येथील शिवानंद विठोबा सांगळे यांनी २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी बाबत माहिती अधिकार कायद्याच्या अनुषंगाने माहिती मागितली असताना सुद्धा आज पावतो माहिती पुरविली नसल्याचे म्हंटले आहे. अंगणवाडी ला तार कंपाऊंड, जाळी, व गेट चे काम दाखऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ग्राम पंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी केल्याचा आरोप केला आहे.

निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलिस अधीक्षक, गट विकास अधिकारी, सिंदखेड राजा, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, सिंदखेड राजा यांना पाठविलेल्या आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये