ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे समुदाय स्नेहभोजन दिवस साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

प्रत्येक पालकांचा एक मूठ धान्य हा उपक्रम राबवून शाळेतील सर्व एकशे पन्नास विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापन समिती ग्राम शिक्षण समिती अंगणवाडी सेविका आशा वर्कर आरोग्य सेविका या सर्वांना गावातील शालेय स्थापन समिती तथा पालकांनी एक मूठ धान्य गोळा करून सर्वांना स्नेहभोजन समुदाय स्नेहभोजन हा उपक्रम शाळेमध्ये यशस्वीरीत्या राबवला.

सदर उपक्रम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर जोगी उपाध्यक्ष अश्विनीताई बुरहान ग्रामपंचायत च्या सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून समुदाय दिवस जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे साजरा करण्यात आला दरम्यान शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये