ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय लोक अदालत – पॅनल न. १ व पॅनल न. २ मध्ये एकूण १६० केसेस निकाली

एकूण १०,१०,०६० रुपये दंड वसूल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.मुन्ना खेडकर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे निर्देशान्वये राष्ट्रीय लोकअदालत तालुका विधी सेवा समिती व तालुका विधिज्ञ संघ, बल्लारपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २७ जुलै २०२४ रोज, शनिवार ला दिवाणी व फौजदारी न्यायालय बल्लारपूर येथे राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आले.

सदर श्रीमती एस.एन. सावळेश्वरकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, बल्लारपूर पॅनल न. १ तसेच श्री अनुपम एस. शर्मा, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर बल्लारपूर पॅनल न. २ वर राष्ट्रीय लोकअदालत राबविण्यात आले.

सदर पॅनल न. १ व पॅनल न. २ मध्ये एकूण १६० केसेस निकाली निघाल्या असून त्यामध्ये एकूण १०,१०,०६० रुपये दंड वसूल करण्यात आला.

सदर लोकन्यायालया मध्ये पॅनल न. १ मध्ये प्रलंबित असलेले कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये येणारी कौ.हीं. म. स. केस न. ७/२०२४ मध्ये एड. सुनील पुरी चे माध्यमातून अर्जदार व गैरअर्जदार (पती पत्नी) मध्ये आपसात समझौता करण्यात आला असून पती ने आपली पत्नीला सोबत नांदविण्याकरिता आपले घरी घेऊन गेले.

कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधी समिती, बल्लारपूर चे पॅनल क्र. १ मधील पॅनल मेंबर एड. गणेश बोधाले आणि पॅनल क्र. २ मध्ये एड. अरविंद तितरे यांचे तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचे सहकार्यामुळे राष्ट्रीय लोक अदालत यशस्वरीत्या पार पाडले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये