ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी, विदेशी, दारुचा एकूण 13 लाख 4 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 27/07/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल पथक व हिंगणघाट विभाग पथक व वर्धा विभाग पथक अशी 03 पथके पो स्टे देवळी परीसरात अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून देवळी येथे राहणारा प्रमोद धात्रक हा त्याचा साथीदार चालकासह त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाचे महिंद्रा स्कार्पियो गाडी क्रमांक एम एच 40 के आर 8378* ने जिल्हा अमरावती येथून पुलगाव, नाचणगाव, आगरगाव, मार्गने त्याचे राहते घरी देवळी येथे देशी, विदेशी दारूसाठा घेवून चिल्लर विक्री करण्याचे उद्देशाने त्याची चोरटी वाहतूक करीत आहे, अश्या माहिती वरून पंचासह देवळी ते नंदोरा रोडवर, सरकारी संडास जवळ, देवळी येथे सापळा रचून आमच्याकडे असलेल्या 03 चार चाकी गाड्यांनी रोड ब्लॉक केला असता आरोपी स्कार्पिओ गाडी चालक यास पोलीस दिसताच स्कॉर्पिओ गाडी जागीच उभी करून आरोपी प्रमोद धात्रक रा दोन्ही देवळी हे मोक्यावरून पसार झाले. त्यांचा शोध घेतला असता मिळून आले नाही. आरोपी प्रमोद धात्रक व स्कार्पिओ गाडी एम. एच. 40 के. आर. 8378 चा चालक यांनी घटनास्थळी सोडलेल्या स्कॉर्पिओ चारचाकी गाडीची पंचा समोर पाहणी केली असता स्कॉर्पिओ गाडीमध्ये

 जप्त माल वर्णन :-

1) 40 खर्डाच्या खोक्यात देशी गोवा संत्रा नं. 1 कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 1920 सिलबंद शिश्या प्रती नग 150 रू ज्यावर बॅच नं R V 17 जुलै 24 असा असून किंमत 2,88,000 /- रु 2) 01 खर्ड्याच्या खोक्यात आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 48 सिलबंद शिश्या प्रती नग 350/- रू प्रमाने ज्याचा बेंच न 096/24 दिनांक 10/06/24 किंमत 16,800/- रू. 3) एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कार्पिओ गाडी क्रमांक एम एच 40 के आर 8378 चारकाची गाडी किमत 10,00,000 रू असा एकुण जु.कि. 13,04,800/- चा मुद्देमाल जप्त करून सदर दोन्ही आरोपीविरुध्द पो. स्टे. देवळी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर कारवाई मा. श्री. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, पो.हवा. गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, यशवंत गोल्हर, प्रमोद पिसे, महादेव सानप, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार अरविंद इंगोले, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये