Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे विद्यार्थी प्रिय,पुस्तक प्रेमी,शास्त्रज्ञ,माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांची ९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी डॉ.कलाम यांचा जगाला चिरंतन संदेश म्हणजे मोठी स्वप्ने पहा,कठोर परिश्रम करा आणि शिकणे कधीही थांबवू नका.त्यांचा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीमध्ये जगात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता आहे असे अध्यक्षस्थानावरून डॉ.कलामांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

    मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,जेष्ठ शिक्षक संजय ढवस,किशोर संगीडवार,धर्मरवी वनकर,प्रकाश गेडाम,अरुण सातपुते,राजेश मांदाळे उपस्थित होते.उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आयोजित कार्यक्रमाचे संचालन सुधीर जीवतोडे यांनी केले तर आभार वनिता गेडाम यांनी मानले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद केलझरकर,रामचंद्र खिरटकर,दामोधर आदर्लावार,सुरेंद्र डोहने,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये