ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी
चांदा ब्लास्ट
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य साईनाथ मेश्राम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षिका सौ विणा देशमुख, जेष्ठ शिक्षिका माधुरी मस्की, समिती प्रमूख प्रा. नंदा भोयर होत्या.सर्वप्रथम उपास्थित अतिथी च्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्र्वेतलाना टिपले यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, संचालन व आभारप्रदर्शन प्रा नितीन वाढई यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.