ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खरीप हंगामात कृषी विभागाकडून विविध कृषी विषयक कामानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 शेतकऱ्यांना विविध हंगामात बांधावर मार्गदर्शन या शासनाच्या परिपत्रकानुसार कृषी विभागा अंतर्गत ग्रामीण भागात नियुक्त कर्मचारी गावामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 23 जुलै रोजी तालुक्यातील मोजे तुळजापूर येथे कृषी विभागामार्फत सभा घेऊन त्यामध्ये कीटकनाशके फवारणी करताना घ्यायची काळजी व सोयाबीन कपाशी पिकावरील किड नियंत्रणाबद्दल याबद्दल श्री कृषी सहायक श्रीकांत पडघान यांनी मार्गदर्शन केले सध्या किड नियंत्रणासाठी फवारणी करताना सर्वप्रथम पंप स्वच्छ करून घ्यावा त्यानंतर औषधाचे मिश्रण तयार करत असताना हात मोजे घालून व तोंडाला मास लावून त्या ठिकाणी मिश्रण तयार करावे रासायनिक भुकटीला सुरुवातीला थोड्या पाण्यात मिसळवे व त्यानंतर गरजेनुसार त्यात पाणी टाकावं फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याच्या किंवा काठीचा वापर करावा कीटकनाशक व इतर औषध किंवा खतामध्ये शिफारशी शिवाय मिसळू नका.

अन्यथा याचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो तसेच फवारणीच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता असेल तर शक्यतो फवारणी टाळावी फार आवश्यक असल्यास फवारणी द्रावणमध्ये चिकट द्रव्य स्टिकर वापरावे प्रखर उन्हात फवारणी टाळावी अशावेळी सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी फवारणी करताना अंग झाकलेले असणे गरजेचे आहे यामध्ये हात आणि पायात मोजे तोंडाला मास डोक्याला कापड आणि अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे फवारणी करताना पंपाचे नोझल शरीरापासून दूर राहावे जेणेकरून कीटकनाशक अंगावर पडणार नाही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुकू नये अथवा हवा तोंडाने आत ओडू नये सोयीस्कर तार काडी किंवा टाचणी वापरावी उपाशीपोटी फवारणी न करता फवारणी पूर्वी न्याहारी करावी फवारणी दरम्यान काही खाऊ नये कीटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चालण्यास किमान दोन आठवडे जाऊ देऊ नये.

कीटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्यास फवारणीचे मिश्रण करताना अथवा फवारणीच्या विविध तंबाखू खाणे अथवा धूम्रपान करणे टाळावे तसेच तसेच फवारणी झाल्यानंतर वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावेत व त्वरित स्नान करून वापरलेले कपडे व इतर कपड्यांपासून वेगळे करून स्वच्छ धुवावे व प्रत्येक शेतकऱ्यांनी वरील बाबीचा अवलंब करूनच फवारणी करावी व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये