Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटार सायकल चोरी करणारे विधिसंघर्षशीत बालकांकडून मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

पो.स्टे. सेलू, जि.वर्धा येथिल गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो.स्टे. सेलू हद्दीत एन.एच. क्र. 361 वरील रमना फाट्याजवळ दिनांक 30/06/2024 रोजी दुपारी अदांजे 15.00 वा. दरम्यान फिर्यादी हे त्यांचे मो.सा. सह रोडच्या बाजूला बेहोश स्थितीत पडून असल्याचा फायदा घेवून तीन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची मो.सा. व बाजुलाच पडून असलेला मोबाईल चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिनांक 04/07/2024 रोजी तक्रार दिल्यावरुन पोस्टे. सेलू येथे अप क्र. 560/2024 कलम 379, 34 भादवीचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला

सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मो.सा. चा शोध घेत असतांना दिनांक 12/07/2024 रोजी गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहीती वरुन मौजा सातगाव, ता. हिंगणा येथिल विधीसंघर्षीत बालकांनी सदर गुन्हयातील मो.सा. व मोबाईल फोन चोरी केल्याची माहीती मिळाल्यावरुन मा. ठाणेदार सा यांचे मार्गदर्शानात रवाना होवून गुप्त बातमीदार यांचे माहीती प्रमाणे पो.स्टापसह मौजा सातगाव येथिल राहणारे विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेवून मोटार सायकल चोरी बाबत विचारपुस केली असता विधीसंघर्षीत बालकांनी पो.स्टे.सेलू येथिल हिरो कंपनीची मो.सा. क्र. MH32AQ6847 व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिल्याने विधीसंघर्षित बालाकांचे ताब्यातून खालील वर्णनाचा माल जप्त करण्यात आला.

1) पो.स्टे. सेलू येथिल अप क्र. 560/24 कलम 379, 34 भादवी मधिल एक हिरो कंपनीची मो.सा. क्र. MH32AQ6847 कि. अंदाजे 35,000/- रु. व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल किं. अंदाजे 4000/- रु,

2) पो.स्टे. हिंगणा हद्दीतील गुमगाव जि. नागपुर येथून चोरी केलेली एक हिरो होंडा कंपनीची स्पेल्डर मो.सा. क्र. MH40W0867 , चेसीस नं. MBLHA10EYBHF58930 असा असलेली किं. अं. 50,000/- रु.

3) गुन्ह्या करते वेळी वापरलेली हिरो कंपनीची मो.सा. क्र. MH40CU8149 किं. अंदाजे 50,000/- असा एकूण जु.किं. 1,39,000/- रु. चा माल विधीसंघर्षीत बालकांकडून जप्त करण्यात आला आहे.

 सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. नुरुल हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर सा., ठाणेदार मंगेश भोयर पो.स्टे. सेलू यांचे मार्गदर्शनात पो.उपनि. निमगडे, पोलीस अमंलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे पोस्टे. सेलू तसेच सायबर सेल वर्धा येथिल पोलीस अमंलदार अंकित जिभे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये