ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकी वाहनाची उभ्या ट्रकला धडक ; दोन ठार दोन जखमी

गडचिरोली चंद्रपूर महामार्गावरील हिरापुर येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

चंद्रपूर – गडचिरोली  राष्ट्रीय महामार्ग ९३० सावलीपासून ७ किमी.अंतरावर असलेल्या हीरापुर जवळ झालेल्या अपघातात ४ वर्षीय बालकांसह २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले.

सविस्तर वृत्त असे की,मृतक उमेश आणि अन्य तीन नवेगाव जि.गडचिरोली वरून आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम.एच.३३ए.इ.१८३७ या गाडीने स्व:गावी अससेल्या फराळा ता.चार्मोर्शी येते जात असताना हिरापुर बस स्टॉप जवळ धोकादायक स्थितीत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेला ट्रक क्रमांक सी.जी. ०८ एएक्स ६१७१ ला धडक दिली.त्यात वरून हरिदास बोरूले वय ४ वर्ष आणि उमेश श्रीरंग गुरनुले वय २७ वर्ष (रा.फराळा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर हरिदास बापूजी बोरुले वय ४० आणि शेवंता बापूजी कावळे वय ६५(रा.नवेगाव) हे गंभीररीत्या जखमी झाले.अपघात झाल्याचे कळताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला लगेच सावली पोलिसांनी शोध मोहीम राबवित सदर ट्रक आणि ट्रक चालकास खेडी फाट्याजवळ ताब्यात घेतले.

सावली पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून जखमी व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे तत्काळ दाखल करण्यात आले,तर मृत दोन व्यक्तीला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सावली येथे ठेवण्यात आले.

     संबंधित ट्रक चालक आणि ट्रक सावली पोलिसांनी पकडलेला असून ट्रक चालकविरोधात वाहन कायद्यानूसार १०६(०१)१२५(A)१२५(B)२८५ BNS २०२३, सहकलम १२२,१३४ A १३४ब गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे,पोलीस हवालदार विनोद नीखाडे,स्वप्नील दुर्योधन,अशोक मडावी संजय शुक्ला यांचेद्वारे करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये