तुळजापूर येथे सामजिक दातृत्व कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तुळजापूर येथे 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत नागरिकांच्या सुकर जीवनमानासाठी सामाजिक दातृत्व कार्यक्रम आज दिनांक 19 मार्च रोजी प्राध्यापक संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा व वैशाली डोंगरजाल तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली व सायली जाधव नायब तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता
सदर कार्यक्रमांमध्ये उत्पन्नाचा दाखले श्रावण बाळ मंजूर प्रस्ताव ॲग्रीस्टॅग पिक पाणी तसेच नागरिकांच्या विविध समस्येबाबत निराकरण करण्यात आले सदर कार्यक्रम मध्ये अनाथ विद्यार्थी पवन साठे यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्यात आले या कार्यक्रमासाठी एन एल वायडे मंडळ अधिकारी तुळजापूर पंढरी जायभाये ग्राम महसूल अधिकारी तुळजापूर एस.बी. बरांडे ग्राम महसूल अधिकारी असोला जहागीर नंदकिशोर राठोड ग्राम पंचायत अधिकारी तुळजापूर श्रीकांत पडघान कृषी सहाय्यक जांभोरा गंगाधर नागरे मुख्याध्यापक तुळजापूर संतोष बीत्रे सहाय्यक शिक्षक रामप्रसाद शेरे महसूल सेवक शिवहरी खार्डे ग्रा पंचयात सदस्य परमेश्वर कोल्हे ,लक्ष्मण कोल्हे व इतर ग्रामस्थ तुळजापूर उपस्थित होते सदर ग्रामस्थ दिन यशस्वीपणे साजरा करण्यात आला