ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतूक करणारे टीप्पर पकडले

१५ लाखाचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

तालुक्यातील जवळखेड फाटा येथे ७जुलै ला रात्री ११.१५च्या दरम्यान अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर क्र. MH ३० B D ०३५१ पोलिसांनी जप्त केले, तसेच चार ब्रास वाळू किँमत १६हजार रुपये असा एकूण १५लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

आरोपी चालक ज्ञानेश्वर विश्वनाथ दहेकर रा निमगाव गुरु याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये