Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ब्रह्मपुरी-वडसा मार्ग बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 मागील अनेक दिवसापासून ब्रह्मपुरी – वडसा रोडवर भूती नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे पुलाचे बांधकाम सुरू असताना वळण रस्ता म्हणून पुलाचे बाजूने कच्चा रोड तयार करण्यात आला परंतु कच्चा रस्ता बनवीत असताना नाल्याच्या पात्राचाअंदाज न घेता वळण रस्त्यामध्ये लहान आकाराचे सिमेंटचे भोंगे टाकून त्यावर वळण रस्ता करण्यात आला.

परंतु काल झालेल्या पावसामध्ये पाण्याची पातळी वाढल्याने सदर रस्ता हा वाहून गेला ब्रह्मपुरी – वडसा रोडवर शाळा कॉलेज राईस मिल व अनेक लोकांच्या शेत आहेत आज प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्ता बंद झालेला आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राईस मिलच्या कामगारांना जाण्यास कोणताच मार्ग उरलेला नाही शाळेत जाणाऱ्यांना व वडसाकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस ना आरमोरी मार्गे जावे लागत आहे याला जबाबदार कोण अशी जनतेची ओरड आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये