ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका मॅरेथॉन स्पर्धेत पालडोह शाळेचे यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती हा आकांक्षीत तालुका म्हणून घोषित झाला.त्यामुळे जिवतीत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉन चे उद्घाटन मशाल पेटवून करण्यात आली. सोहळ्याची मशाल ज्योत उद्घाटक जिल्हा अधिकारी विनय गौडा,व विवेक जॉन्सन यांना सुपूर्द केली.त्यांनी मशाल पेटून शुभारंभ केला.हवेत फुगे सोडून मॅरेथॉन ची फीत कापून उदघाटन केले.

    या मॅरेथॉन स्पर्धेत ३६५ दिवस चालणारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह येथील ६ मुलांनी सहभाग घेतला होता.

    या स्पर्धेत मुलामधून प्रथम क्रमांक विवेक चव्हाण व चौथा क्रमांक सोहम वाघमारे यांनी घेतला. तर मुलीमधून प्रथम क्रमांक कु पायल चव्हाण तर कु साक्षी वारलवाड हिने तिसरा क्रमांक पटकावला.

    मुलांना या मॅरेथॉन मध्ये प्रमाणपत्र देऊन जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन जिवतीचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड, प्राथमिक शिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी भिंगारदेवे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये