ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील लिंक फेलमुळे शेतकरी त्रस्त

बँकेतील यंत्रणेत बिघाड की लिंक फेल ; आठ दिवसांपासून बँकेत गर्दी मात्र लिंकच नाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेत मागिल आठ दिवसांपासून लिंकच नसल्याचे फलक लावले गेल्याने ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडला असून याबाबत शाखा अधिकाऱ्यांना विचारणा करणाऱ्या बचत गटांच्या महिलांना उडवाउडवीची उत्तरे देत असभ्य वर्तनूक मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन मुजोर शाखा अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून बँकेतील व्यवहार सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे

     ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था संपूर्ण शेतीवर अवलंबून आहे.सध्या पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे पिक लागवडीसाठी पैसे लागत असल्याने शेतकरी व बचत गटातील महिलांनी पिक कर्जासाठी अर्ज करून महिनाभराचा कालावधी निघून गेला मात्र ऐन पेरणीच्या हंगामात बँकेने लिंक फेलचा फलक लावून शेतकऱ्यांना व बचत गटांच्या महिलांना आर्थिक कोंडित आणले जात आहे.दरवर्षी या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून वेळेवर महिला बचत गटांना व शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत असल्याने तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी व बचत गटासह वयोवृद्ध नागरीकांनी या बँकेत खाते उघडले आहेत.

मात्र शाखा अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कुठल्याच शेतकऱ्यांना किंवा बचत गटांच्या महिलांना अजूनही कर्ज देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली नसल्याने दररोज शेकडो नागरिक व महिला रिकाम्या हाताने येरझाऱ्या मारताना दिसत आहेत.तालुक्यातील इतर संपूर्ण बँकांमध्ये देवाण-घेवाण करण्याचे व्यवहार इंटरनेट प्रणालीद्वारे सुरळीतपणे केले जात आहे मात्र विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतच का नाही लिंक फेल की इतर काही बिघाड हे अजूनही कुणाला कळले नाही.

दररोज बँकेच्या कामांसाठी शेतकरी व बचत गटातील महिला शेतातील पेरणीची कामे सोडून बँकेत येतात.बँकेत मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र काम कुणाचेच होत नाही.विविध कारणे सांगून त्यांना येरझाऱ्या मारायला लावतात.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये