ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथील बसस्थानक चौकात ट्रक-दुचाकीचा अपघात

अपघातात शिक्षकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली येथील चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील बसस्थानक चौकात वर आज सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास झालेल्या ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुचाकी स्वार शिक्षक निळकठं शेडमाके यांचा मृत्यू झाला.

चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे टाटा आयसर ट्रक क्रमांक एमएच -०५ – सीबी ८००० जाणाऱ्या सिमेंटच्या ट्रकने निळकंठ शेडमाके दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ एवाय ३८१० यांना धडक दिली आणि शेडमाके हे जागीच कोसळले व त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.लगेच त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र उपचार करीत असतानाच त्या ठिकाणी शेडमाके यांचा मृत्यू झाला.

मृतक नीलखंठ शेडमाके हे सावली तालुक्यातील कढोली येथे आश्रम शाळेत शिक्षक आहेत.त्यांची मूळ वस्ती ही तालुक्यातील पेंढरी (मक्ता) येथील आहे. 15 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद ची निवडणूकही लढलेली होती.त्यांच्या मृत्यू ने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये