Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी – प्रा. विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर—-सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजातील शोषित पिढीत आणि वंचित समाजाला पुढे आणणारे असून त्यानी महिलांच्या शिक्षण हक्कासाठी व महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुध्द लढण्यासाठी होते व मुलींना शिक्षण देऊन समाजात त्याना पुढे आणण्याचे कार्य केले असे मनोगत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले ते गडचांदूर येथील ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ची व हार अर्पण करून पूजा करण्यात आली व कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठावरी व शाळेच्या प्राचार्या सौ निर्मला ठावरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे दिली व शिक्षकांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाळा शाळेचे विद्यार्थी व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये