ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांझ विहार म्युझिक ऍकॅडमी तर्फे आर.डी बर्मन यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

संगितकार, गायक आर.डी बर्मन यांच्या ८५व्या जयंतीनिमित्त सांझ विहार म्यूझिक ऍकॅडमी  ब्रम्हपुरी तर्फे आयोजित “स्वर उमंग” या उन्हाळी शिबिराचे समारोपिय संगीतमय  कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २९ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.३०  वाजता  विठ्ल रुख्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे आयोजन करण्यात आले आहे. या संगीतमय कार्यक्रमात अकॅडमीचे  विद्यार्थी गायन कला, नृत्यकला, वाद्य कला तसेच प्रसिद्ध गायक कलावंताचा  एका पेक्षा एक सादरीकरण भव्य दिव्य मंचावर होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य अशी सांझ विहार  अकॅडमी आहे ही वर्षभर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असते या ऍकॅडमी मध्ये दरवर्षी परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना गायन ,विविध प्रकारचे वाद्य यांचे प्रशिक्षण देत असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता मंच उपलब्ध करून देते शहरातील संगीतप्रेमिना गीत संगीताची मेजवानी मिळावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.
 संगितकार, गायक आर.डी बर्मन यांच्या ८५व्या जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांझ विहार म्युझिक ऍकॅडमी चे संचालक गायक संगीतकार जगदीश गोमिला यांनी केले आहे.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये