जे सी आय राजुरा रॉयल्स तर्फे योग दिन उत्साहात साजरा
सुप्रभात महिला योग वर्गाने दिले उस्फुर्त सहकार्य
![](https://chandablast.com/wp-content/uploads/2024/06/IMG_20240628_160032.jpg)
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
आरोग्य संवर्धनासाठी तसेच निरामय जीवनासाठी भारतीय प्राचीन उपचार पद्धती म्हणुन योग साधनेला विशेष महत्त्व आहे. योग साधनेची महती तसेच महत्त्व जागतिक स्तरावर सिध्द झाल्यामुळे 21 जुन हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय योग दिवस मान्य केला असुन संपुर्ण जगात ह्या दिवशी योग साधनेचे महत्त्व विषद करून नागरिकांना योग शिकविल्या जातो तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
ह्याच उपक्रमाचे औचित्य साधुन जे सी आय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा स्वरुपा झंवर ह्यांनी राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर येथिल सुप्रभात महिला योग वर्गाच्या सहकार्याने योग दिनाचे आयोजन केले होते.
जे सी आय राजुरा रॉयल्स च्या अंतर्गत सुप्रभात महिला योग वर्ग येथे अंतर्राष्ट्रीय योग दिन नुकताच साजरा करण्यात आला. भारतीय परंपरांचे पालन करीत आयोजक महिलांनी उपस्थितांचे स्वागत मंगल औक्षणाने केले. ह्यावेळी पतंजली योग समितीच्या शिक्षिका सरोज हिवरे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष ॲड. अंजली गुंडावार ह्यांचेसह प्रमुख पाहुण्या म्हणुन राजुरा महिला मंडळाच्या अध्यक्षा नम्रता खोंड, राधा धनपावडे, अनुष्का रैच विशेषत्वाने उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानी असलेल्या पतंजली योग समितीच्या साधक ॲड अंजली गुंडांवर ह्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनपर केलेल्या संबोधनातून योग साधनेचे मानवी तसेच विशेषकरून महिलांच्या दैनंदिन जीवनात असलेले महत्त्व विषद केले. योग शिक्षिका सरोज हिवरे ह्या रामपुर येथे मागील दोन वर्षांपासून महिलांसाठी नियमित योग वर्ग घेत असुन महिलांना योग साधनेचा लाभ मिळावा ह्या उद्देशाने सुरू केलेला योग वर्ग दोन वर्षांपासून नित्यनियमाने सुरू असल्याबद्दल स्वरुपा झंवर ह्यांनी त्यांचे तसेच प्रामाणिकपणे नियमित योग साधना करणाऱ्या महिलांचे विशेष अभिनंदन केले तसेच निरोगी शरीर व स्वस्थ मन ह्यासाठी योग साधनेचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे संचलन सरोज हिवरे ह्यांनी तर आभार प्रदर्शन गीता लोहे यांनी केले, गणपती चौधरी ह्यांनी विशेष सहकार्य दिले.