ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरकारी पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा

पिकाचे नुकसान लाखात मात्र भरपाई मिळाली 5 ते 10 टक्के

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नुकसान ८० टक्के मात्र दाखवण्यात आले ३० टक्के

शेतकऱ्यांचे नुकसान झाले तितकी नुकसान भरपाई पीकविमा कंपनीकडून देण्यात यावी

शेजारी जिल्ह्याला एक न्याय मग आमच्यावर अन्याय का ? : अन्नदाता एकता मंचचा

एन पिक काढणीच्या वेळी सोयाबीन पिकावर येलो मोयजक आणि इतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक गेलं! त्यामुळे शेतकऱ्यांना ८० टक्के नुकसान झाले. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेले असताना चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर देण्याचे आणि नंतर उत्पादनात किती घट झाली त्यानुसार नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र जिल्ह्यासाठी असलेली द ओरीयंट इन्शुरन्स कंपनीने मात्र आदेशाचे पालन केले नाही. वर्षाच्या अखेर नाममात्र ५- १० टक्के नुकसान भरपाई देण्यात आली. शेजारील असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीकविमा नुकसान भरपाई मिळाली असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय कसा काय असा प्रश्न अन्नदाता एकता मंचने केला आहे.

मागील वर्षी एच डी एफ सी ऍग्रो इन्शुरन्स कंपनीने स्वतःच नुकसान झालेले पंचनामे स्वतः बदलवून शेतकऱ्यांना नाममात्र नुकसान भरपाई देण्यात आली. तेव्हा अन्नदाता एकता मंचाच्या माध्यमातून शेकडो महिला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे धडकल्या नंतर पिपरी (देश) तालुका भद्रावती येथील शेतकऱ्यांना वाढीव १५ लाख नियमानुसार पीकविमा नुकसान भरपाई मिळाली.

केंद्र सरकारची कंपनी असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांना स्वतःच्या न्यायासाठी लढावेच लागेल. काही सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना तर दोन आखडी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळाली आहे.

जर सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना नियमानुसार पीकविमा नुकसान भरपाई मिळत नसेल तर आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरू पण आम्ही आमच्या हक्काची नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशारा अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष श्री संदीप कुटेमाटे, संस्थापक अनुप कुटेमाटे, मोहन दर्वे, विठ्ठल अर्जूनकर, अमोल क्षीरसागर, धनराज भोयर, गजानन भोयर, योगेश मत्ते, अक्षय कुटेमाटे, डोमा कुटेमाटे, धनराज बोबडे, साहिल काकडे आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये