ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नववर्षानिमित्त दुर्गा मंदिरात उभारली गुढी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येळकळी येथील महिला मंडळाकडून दुर्गा मातेच्या मंदिरात गुढीपाडवा निमित्त कळसावर गुढी उभारण्यात आली होती . महिला मंडळाकडून मंदिराच्या कळसावर गुढी उभारून भक्तिमय वातावरणात पूजा करून ही चैतन्याची गुढी उभारण्यात आली. गुढीपाडवा नविन वर्षाची सुरुवात दर्शविणारा महत्त्वाचा मराठी सण आहे. हिंदू कॅलेंडरच्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी भाविकांची मंदिरात गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मात्र गुढीपाडवा निमित्त भाविकांना विशेष प्रसाद वाटप करण्यात आला होता. याप्रसंगी सरला चापडे, सरला भांडेकर ,वैशाली ठोंबरे, शितल गडकर, योगिता भांडेकर, मीना ठोंबरे, योगिता लटारे, वैशाली शेंडे ,गीता कुकड्कार, लता वाईसकर या महिलांनी योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये