ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील रासेयो विभागाने राबविली स्वच्छ्ता मोहीम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदर येथील राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण सेवा योजना विभागातर्फे स्वच्छता ही सेवा अंतर्गत आठवडी बाजार गडचांदूर येथे स्वच्छता मोहीम आज २५ सप्टेंबर रोजी राबविण्यात आली.

याप्रसंगी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, रासेयो अधिकारी प्रा. प्रदिप परसुटकर, पसेयो अधिकारी प्रा. सचिन भैसारे, प्रा. सुधीर थिपे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये