ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूरने यावर्षी सुद्धा उत्कृष्ठ निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय , गडचांदुरचा इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा उत्कृष्ठ लागला आहे

विज्ञान शाखे चा- ९७.०८ %

कला शाखेचा- ९२.५२ %

एम सी वी सी शाखेचा निकाल- १०० % लागला असून महाविद्यालयाने कोरपना तालुक्यातून विज्ञान ,कला व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

विज्ञान शाखा :

१)कु. रुचिता सुनील तेलंग – ८५.६७ %

२) कु.सानिया युसुफ शेख – ८१.५०%

३) कु. प्रज्ञा वामन जीवने – ७९.८३ %

कला शाखा :

१)विशाल विठ्ठल पवार – ८३.०० %

२)आदित्य विनोद कडूकर- ८३.०० %

३)कु. साक्षी कैलास डोहे – ८३.०० %

व्यावसायिक अभ्यासक्रम :

मार्केटिंग विभाग :

१)प्रवीण धनराज कामरे – ७२.१७ %

२) सत्यजीत सुजित मल्लिक – ६६.३३ % व्यावसायिक क्रॉपसायन्स विभाग :

१) प्रेम रवींद्र सातपुते – ६५.३३ %

२)निखिल शिवाजी बावणे – ५९.१७ %

कला शाखेत 11 विद्यार्थि प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण. तर 34 विद्यार्थि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. विज्ञान शाखेत 8 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण तर 21 विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयात कऱण्यात आला, याप्रसंगी प्राचार्य स्मिता चिताडे, सचिव धनंजय गोरे, उपाध्यक्ष विठ्ठलराव थीपे, संचालक रामचंद्र सोनपितरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, सेवानिवृत्त प्रा वांढरे, तथा विद्यार्थी, शिक्षक,पालक उपास्थित होते

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य तथा उपप्राचार्य, पर्यवेक्षक तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये