Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शारदा माता भुयार देवस्थानाचा विकास करा

आ. सुभाष धोटेंचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथून अडीच किलो मीटर अंतरावर आदिवासी कोलाम समाज बांधवांचे श्रद्धास्थान शारदा मातेचे भुयार देवस्थान आहे. येथे परिसरातील तसेच अनेक भागातील भावीक पुजाअर्चा करण्यासाठी येत असतात मात्र शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे देवस्थान पुर्णत: जिर्ण झालेले आहे. तसेच येथे ये जा करण्यासाठी रस्ता नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, गुहेत उतरण्याच्या मार्गावर ३० फुट खड्डा पडला असून अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे सदर समस्या सोडविण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक पावले उचलण्यात यावीत आणि येथे आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा, लाईनगुडा, अंबेझरी, लचमा गुडा, जनकापूर, डोमपेल्ली, करजेवाडा तथा विविध गाव परिसरातील जंगु भिमराव मडावी, देवराव भीमू मडावी, भीमराव पत्रु मळावी, भीमराव जैतू मडावी, आयुष जैतू मडावी, जैतु भीमू मडावी, फरबु मोतीराम मडावी, भीमू जैतू मडावी, भीमराव मुक्ता मडावी, विजय भीमराव मडावी, जलमा बाळू मडावी, भीमराव मारू मडावी, भीमराव जैतु मडावी, जयतु मुत्ता मडावी, पगु रामु मडावी, राकेश मुकुंदराव मडावी, आनंदराव रामू मडावी, अमृतराव मडावी यासह अनेकांनी आ. सुभाष धोटे यांची प्रत्त्यक्ष भेट घेऊन शारदा माता भुयार देवस्थान येथे विकासकामांसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात मागणी केली. या मागणीची तातडीने दखल घेऊन आ. धोटे यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे वरील मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये