Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

त्या १० शिक्षकांचे लोकसभा निवडणूक कर्तव्यार्थ मानधन केव्हा मिळणार

चांदा ब्लास्ट

        सम्पूर्ण भारतात लोकसभा निवडणूकीचे रणसिंग फुकले गेले आणि संपुर्ण शासकीय यंत्रणा लोकसभा निवडणूकीसाठी सज्ज झाली.चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर लोकसभा,गडचिरोली-चिमुर लोकसभा दि.१९ एप्रिल २०२४ ला अगदी शांततेत पार पडली. विविध मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी यांना यावेळी नगदी रुपात निवडणूक कर्तव्यार्थ मानधन मिळाले मात्र ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात काम करणारे राखीव पथकातील १० मतदान अधिका-यांना मानधन प्राप्त झाले नाही. हे १० मतदान अधिकारी नियोजित सभेला हजर होते व दि.१९ एप्रिल २०२४ ला अगदी सकाळीं ६ वाजता तहसिल कार्यालय सावली येथे निवडणुकीच्या कामासाठी सज्ज होते.

या १० मतदान अधिका-यांना सावली तालुक्यातील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी चे काम करण्यासाठी तहसिलदार सावली यांनी आदेशीत केले होते त्यानुसार १० ही मतदान अधिकारी नेमुन दिलेल्या मतदान केंद्रावर लोकसभा निवडणूकीची कामे आटोपलीत मात्र मतदान केंद्रावर त्यांना मानधन दिले गेले नाही म्हणून त्या १० मतदान अधिकारी यांनी दि.२ मे २०२४ ला तहसिलदार सावली यांना मानधन मिळणेसाठी निवेदन दिले आहे परंतु आजमितीस त्या १० शिक्षकांना निवडणुकीचे मानधन मिळालेले नाही तरी त्यांना मानधन मिळावे यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदनाद्वारे विनंतीवजा मागणी केलेली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये