आय आय टी जे ए एम 2025 मध्ये प्रतिक्षा चंदनखेडे हिचे सुयश
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सचा गौरव!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथील विद्यार्थिनी प्रतिक्षा चंदनखेडे (B.Sc. भाग 3), रा. खिर्डी हिने आय आय टी जे ए एम 2025 परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. तिने बायोटेक्नॉलॉजी शाखेत यश मिळवून आपल्या महाविद्यालयाचे तसेच कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.
IIT JAM (Joint Admission Test for Masters) ही भारतातील प्रतिष्ठित परीक्षा असून यशस्वी विद्यार्थ्यांना IIT आणि इतर नामांकित संस्थांमध्ये मास्टर्स पदवीसाठी प्रवेश मिळतो. ही परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर IIT दिल्लीद्वारे घेण्यात आली होती.
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तिच्या यशामुळे गडचांदूर परिसरात आनंदाचे वातावरण असून नव्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. तसेच, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स तर्फे आयोजित दीक्षांत समारंभात मान. गहलोत साहेब एच आर हेड माणिकगढ सिमेंट, मान. विठ्ठलराव थिपे, उपाध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, मान. धनंजय गोरे ,सचिव, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, मान. रामचंद्र पाटील सोनपित्रे संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शैलेश देव यांच्या प्रमुख उपस्थितीत तिचा विशेष सन्मान करून गौरव करण्यात आला.