ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जबर मारहाणीत एकाचा मृत्यू : तर एक जखमी
शहरातील भंगाराम वार्ड येथील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
घरावर काही इसमानी हल्ला करून दोन भावंडांना जबर मारहाण केली. या महाराणीत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाआहे.
सदर घटना दिनांक २८ रोज शुक्रवारला रात्रो ८.१५ वाजताच्या सुमारास शहरातील भंगाराम वार्डात घडली. अमर कुळमेथे, राहणार भंगाराम वार्ड असे मृतकाचे नाव असून त्याचा मोठा भाऊ रोशन कुळमेथे हा या महाराणीत गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना ही जुन्या वादातून घडल्याचे समजते. मारहाणीतील आरोपी फरार असून त्यांचा शोध भद्रावती पोलीस घेत आहे. या घटनेविषयी अद्याप सविस्तर माहिती पोलिसांकडून प्राप्त झालेली नाही.