ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीतील अवैध दारु विक्रेत्यावर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीतील अवैद्य दारु विक्रेता सचिन बारकुजी मसराम, वय ४३ वर्ष, रा. राणी दुर्गावती नगर, बुरड मोहल्ला, इतवारा, वर्धा याचेविरुध्द पोलीस स्टेशन वर्धा (शहर) चे अभिलेखावर दारुबंदी कायद्यान्वये एकुण ४६ गुन्हे नोंद असुन शरिराविरुध्दचा १ गुन्हा व अश्लिल शिवीगाळ प्रकरणी १ गुन्हा नोंद आहे. तसेच सदर अवैद्य दारुविक्रेता हा वर्धा शहरात व परीसरात मोठया प्रमाणात गावठी मोहा दारुची निर्मीती करुन त्याची विक्री करीत होता. स्थानबद्ध इसमाकडुन जप्त करण्यात आलेल्या दारुमध्ये इथील अल्कोहोलचे प्रमाण हे अत्याधिक आढळुन आलेले होते जे मानवी शरीरास अत्यंत घातक व दुष्परीणामकारक असल्याचा अभिप्राय सुध्दा वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला होता.

स्थानबध्द सचिन बारकुजी मसराम याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन वर्धा अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने याचेविरुध्द ठाणेदार वर्धा (शहर) यांनी महाराष्ट्र इ पडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक सत्यवर बंडीवार यांनी सादर केला होता. सदरहु प्रस्तावाचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांर्भीयाने दखल घेवुन अवैध दारु विक्रेता नामे सचिन बारकुजी मसराम, वय ४३ वर्ष, रा. राणी दुर्गावती नगर, बुरड मोहल्ला, इतावारा, वर्धा याचा दिनांक ३१.०७.२०२३ रोजी स्थानबध्द आदेश जारी केल्याने त्यास वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृह, वर्धा येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच भविष्यात वर्धा जिल्ह्यातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते, रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुध्द उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे पुनःश्च संकेत मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्था.गु.शा. वर्धा, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर पो.स्टे. वर्धा (शहर), पोउपनि. दिलीप तिजारे पो.स्टे. वर्धा (शहर), पोहवा. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, स्था. गु.शा. वर्धा, पोहवा. अमोल आत्राम, नापोअं. दिपक जंगले दोन्ही पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये