ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बी. आर.आंबेडकर यांची १३३ जयंती वर्धा शहरात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा येथील सिव्हिल लाइन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ १४एप्रिल २०२४ ला भीम जंयतीनिमित्ताने दुपारी १२ वाजता सत्यमेव जयते जनजागृती कलाकार परिषद वर्धा जिल्ह्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळाला संस्थेचे सचिव पद्माकर कांबळे अध्यक्ष बबनराव येवले व कार्यकारी पदाअधिकारी आणि सदस्य यांनी भव्य मोठा हार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बबनराव येवले व परिसरातील भीम सैनिक प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी वर्धा जिल्हा चे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार व सत्यमेव जयते जनजागृती कलाकार परिषद वर्धा जिल्हाचे सचिव पद्माकर कांबळे यांनी देशातील बहुजन बांधवांना भीम जयंती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोष देऊन जयंती दिनानिमित्त गीत सादर केले.यावेळी सत्यमेव जयते जनजागृती कलाकार परिषद वर्धा जिल्हाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला

बबनराव येवले

अध्यक्ष

सत्यमेव जयते जनजागृती कलाकार परिषद वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये