ताज्या घडामोडी

वनिता मोहितकर विशारद परीक्षा उत्तीर्ण.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 शहरातील श्रीरामनगर येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुटकाळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वनिता मोहितकर यांनी नागपूर विद्यापीठाची विशारद भाग एक ही परीक्षा उत्तीर्ण केली.अशा पाच परीक्षा उत्तीर्ण करून शास्त्री ही पदवी संपादन करण्याचा त्यांचा मानस आहे.

यापूर्वी त्यांनी प्रज्ञा ही प्रथम परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्यांनी फैजपूर येथील श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातर्फे सदर परीक्षा घेण्यात आली होती.

सदर परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे भद्रावती शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये