ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत वयोवृद्ध (85+ )आणि दिव्यांग मतदाराचे होणार घर बसल्याच मतदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज 24- सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका पार पडल्या.

विधानसभा मतदारसंघातील सर्व बी एल ओ यांची आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी एक दिवसाचे प्रशिक्षण सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा येथे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

सर्व बीएलओ यांनी आपले मतदान साहित्य घेऊन मतदारांना वोटर स्लिप वाटप करायचे आहेत, सदर स्लीप या घरपोच करायचे आहेत.

दिव्यांग मतदार व 85 वर्षावरील मतदार निरीक्षण करून यादी सादर केलेली आहे तसेच वरीलपैकी मतदार जर गैरहजर असेल तर ती वोटर स्लिप जपून ठेवायची आहे . वाटप झालेले मतदान चिट्ठी बाबत प्रमाणपत्र आणि उरलेले स्लिप व साहित्य जमा करण्यात यावे. बीएलओ यांनी मतदार गैरहजर राहिल्यास मतदार यांचे चिठ्ठी वितरण बाबत प्रश्न उपस्थित केला असता याबाबत अहवाल सादर करावा.

आजच्या दिवसाची दुसरी बैठक मा. खडसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी एक वाजता पार पडली. टपाल व्यवस्थापन टीम च्या माध्यमातून सर्व झोनल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

दिव्यांग मतदार व 85 वर्षे वरील मतदार यादीनुसार एकूण 806 अर्ज प्राप्त झाले आहेत, दिनांक 14 नोव्हेंबर 2024, 15 नोव्हेंबर 2024,16 नोव्हेंबर 2024 पर्यंत घरपोच मतदान प्रक्रिया करून घेण्यात येणार आहे त्याकरिता 25 पथके तयार करून नियुक्त करण्यात आले आहेत. सदर पूर्ण प्रक्रिया करता बीएलओ यांनी गावांमध्ये उपस्थित राहायचे आहे.

आजच्या बैठकीला मा.तहसीलदार सिंदखेड राजा श्री. अजित दिवटे , मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा. गटविकास अधिकारी सिंदखेड राजा श्री. मुकेश महोर,मा. मुख्याधिकारी सिंदखेड राजा श्री.प्रशांत व्हटकर , मा.नायब तहसीलदार श्री. मनोज सातव ,मा. नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, मा. नायब तहसीलदार सिंदखेडराजा प्रवीणकुमार वराडे, मा.प्र.नायब तहसीलदार श्री.नितीन बढे, मा. नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव, टपाल टीमचे सहायक नोडल अधिकारी सय्यद नजीर सय्यद रजाक, मा. विवेक जगताप, प्रसारमाध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के इत्यादी अधिकारी तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये