ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आदर्श कॉलनी येथील सिद्धेश्वर देविदास नरोडे,(२४) या युवकाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४एप्रिल च्या रात्री उघडकीस आली आहे.

सिद्धेश्वर हा रात्री घरी एकटाच होता, घराचे दरवाजे आतून बंद होते, त्याचे आई वडील लग्नसमारंभ आटोपून रात्री घरी आल्यावर सिद्धेश्वर ल मोबाइल फोन केला मात्र फोन उचलला नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना आवाज दिला, दरम्यान खिडकीतून डोकावून पाहीले असता सिद्धेश्वर ने गळफास घेतल्याचे दिसले, घटनेची माहिती पोलिस स्टेशनला मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

पाहणी करून मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला, पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद केली आहे, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये