मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नगर परिषदे तर्फे जनजागृती
शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
मतदारांनी या लोकशाही प्रधान देशांमध्ये आपणास जो मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे त्या अधिकाराचा मतदारांनी पुरेपूर उपयोग करून लोकशाही बळकटी करण्यासाठी आपले बहुमूल्य मत देऊन मतदानाचा हक्क बजावावा यासाठी शहरात नगर परिषदेच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून यासाठी नपचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी पुढाकार घेतला आहे तर शहरातील मतदारांसाठी ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे सोबतच “मी मतदान करणार”…. हातभर तक्रारींचा बोटभर उपाय नमस्कार मी “एकी” एकी हे माझे नाव आहे निवडणूक यंत्रणेची दूत शिस्त एकी जबाबदारी ही माझी वैशिष्ट्ये आमच्या सारखीच शिस्त बाळगून तुम्ही वेळेत मतदार यादीत नाव तपासावा यादीत नाव नसेल तर नोंदणी करावी आणि नंतर जबाबदारीने आपला मताधिकार बजावा हे सांगायलाच मी आली आहे काय मग माझं एकाल ना ? आणि लोकशाहीसाठी “एकी दाखवाल ना ? या प्रकारचे सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलेले आहे गरीब श्रीमंत जात धर्म लिंग या भेदापासून दूर म्हणजे आपले मत सर्वांना समान अधिकाराच्या तत्त्वाची प्रतिबिंब म्हणजे आपले मत लोकशाहीतील समानतेला ही मूल्य अधिक बळकट करूया चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया याप्रमाणे जाहिराती करण्यात येत असून मतदाराला जागृत करण्याचे काम नगर परिषद प्रशासन करीत आहे.