Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राज्यस्तरीय “दर्पणकार” पुरस्कार प्राप्त पत्रकार अतुल कोल्हे यांचे भद्रावती येथे भव्य स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     नाशिक येथील वर्च्यु सभागृहात राज्यस्तरीय दर्पणकार पुरस्कार प्राप्त केल्यानंतर भद्रावतीत आगमन करणारे शहरातील पत्रकार अतुल कोल्हे यांचे शहरातील बस स्थानक चौकात शहरातील पत्रकार संघटना तथा विविध संघटनेतर्फे व मित्र मंडळातर्फे ढोल ताशांच्या निनादात पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले.

अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया व सक्षम पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता क्षेत्रातील मोलाचे योगदान लक्षात घेता शहरातील पत्रकार अतुल कोल्हे यांना राज्यस्तरीय “दर्पणकार” पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शहर आगमनानिमित्त त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार अतुल कोल्हे, मोनालिका अतुल कोल्हे, पत्रकार सुनील पतरंगे, ईश्वर शर्मा, उमेश कांबळे, श्री हनुमान जन्मोत्सव समितीचे पवन हुरकट, करण तिडके, स्वराज्यवीर संघटनेचे स्वप्निल मोहितकर, इमरान बब्बू कुरेशी, राजेश चव्हाण, इजाज शेख, योगेश वाळके, राहुल खांदारे, संजय राय, योगेश खडके आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये