ताज्या घडामोडी

प्रतिभा धानोरकर ह्यांच्या उमेदवारी अर्ज निवडक नेत्यांच्या उपस्थितीत दाखल

जोरदार शक्तिप्रदर्शनासह उद्या सादर करणार दुसरा अर्ज - महाविकास आघाडीचे बडे नेते राहणार उपस्थित

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

काँग्रेस पक्षाने आ. प्रतिभा धानोरकर ह्यांची चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी जाहिर केल्यानंतर क्षेत्रात राजकीय वातावरण तापणे सुरू झाले असुन सर्वच प्रमुख गटबंधन तसेच इतर लहानमोठे पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज सादर करणे सुरू केले आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्यांनी 26 मार्च रोजी आपल्या नामांकनाचा पहिला संच आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील निवडक नेत्यांच्या उपस्थितीत दाखल केला आहे.

आज विरोधी महायुतीने बड्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परंपरा जवळपास सर्वच पक्षात असल्याने काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्यांनी संभाव्य अडथळे विचारात घेऊन 26 मार्च रोजी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असुन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व जोश निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून 27 मार्च रोजी त्या आपल्या उमेदवारी अर्जाचा दुसरा संच दाखल करणार आहेत.

इंडिया आघाडी च्या उमेदवार म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी प्राप्त झाल्याने 27 मार्च रोजी सकाळी 11.00 वा. कोहीनुर ग्राऊंड, दादमहल वार्ड, चंद्रपूर येथून रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार, माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विष्वास नांदेकर, राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, संदीप गिऱ्हे जिल्हाध्यक्ष उ.बा.ठा. गट, दिलीप चौधरी मराठा सेवा संघ, सोहेल शेख जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी, अरुण भेलके सी.पी.एम नेते, प्रकाश रेड्डी सी.पी.आय. नेते, रविंद्र उमाटे आयटक नेते, मयूर राईंचवार जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, संजय देरकर यासह अनेक इंडिया आघाडीतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11.00 वा. हि रॅली कोहीनुर मैदानाजवळून गांधी चौक मार्गे जाणार असून सदर रॅलीचा समारोप न्यु इंग्लिश शाळेचे मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे होणार आहे. यानंतर दु. 3.00 वा. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान इंडिया आघाडीच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये