ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद, बल्लारपुर तर्फे थकीत मालमत्ताधारक व दुकान गाळेधारकांवर जप्तीची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

      नगर परिषद, बल्लारपूर अंतर्गत अनेक मालमत्ताधारकांनी व दुकान गाळेधारकांनी वारंवार सूचना च मागणी नोटीस देऊन सुध्दा मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे दिनांक २२/०३/२०२३ रोजी विशाल वाघ मुख्य अधिकारी, नगर परिषद बल्लारपूर यांचे आदेशान्वये मालमत्ता धारकांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली. त्यात सब एरिया मॅनेजर, डब्ल्यू सी.एल. यांचे कार्यालय, तसेच डॉ नितीन कल्लुरवार यांचे मालमत्ते मध्ये असलेले मुथुट फायनन्स व इसाफ फायनन्स या मालमत्तेस सिल करण्यात आले.
      सदर कार्यवाही विशाल वाघ मुख्य अधिकारी यांचे निर्देशान्वये जयवंत काटकर उपमुख्याधिकारी,  किशोर डाखोरे, आकाश मुन, राजेंद्र बाराहाते, फुलसिंग गहेरवार, अशोक कोडापे, चापले, अतिक्रमण पथकातर्फे अनिल डंगोरे व त्यांचे सहकारी व नगर परिषदेचे इतर कर्मचारी यांचे तर्फे करण्यात आली.
        त्याचप्रमाणे उर्वरीत काही मालमत्ताधारक व दुकान गाळेधारकांवर जप्तीची व सिलींगची कार्यवाही दिनांक २६/३/२०२४ रोजी करण्यात येणार असुन सदर कार्यवाही सलग दिनांक ३१/०३/२०२४ पावेतो सुरु ठेवण्यात येईल असे विशाल वाघ मुख्य अधिकारी यांनी कळविले आहे. तरी बल्लारपूर शहरातील सर्व मालमत्ताधारक व दुकान गाळेधारक यांना आपलेकडे थकीत असलेला मालमत्ता कर व किराया लवकरात लवकर न.प. कार्यालयात जमा करुन जप्तीची कार्यवाही टाळावी व नगर परिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन देखील मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांनी केले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये