ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना 12 तासात ठोकल्या बेड्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     दिनांक 05/06/2025 जखमी निश्चय भगत हा त्याची मैत्रीण हिचे सोबत फिरण्या करीता ITI टेकडी, वर्धा येथे गेला असता आरोपी 1) अरमान पठाण,, 2) अब्रार खान, 3) सनी, 4) इतर तिन यांनी जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी/जखमी यास जीवे मारण्याच्या उद्देशाने हमला करून डाव्या बाजूचे कमरेवर व मांडीवर दोन्ही बाजूस चाकूने मारून गंभीर जखमी केल्या वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 392/25 कलम 109(2), 189 (2), 189 (4), 296 BNS चा गुन्ह्या नोंद करण्यात आला.

      सदर गुन्हयातील आरोपी हे घटने तारखे पासून पसार झाले असतांना श्री अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपी शोध कामी स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीची माहिती काढून आरोपी शोध कामी नागपूर येथे रवाना होऊन आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी 1) अरमान समीर पठाण, वय 20 वर्षे, रा. स्टेशनफैल, वर्धा, 2) यश संतोष ठाकूर, वय 22 वर्षे, रा. विक्रमशीला नगर, सिंधी (मेघे) वर्धा हे खराबी, नागपूर येथे लपून असल्याची माहिती मिळताच मोठ्या शिताफिने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना गुन्हयाबाबत विचारपूस केली असता गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहे.

     सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.उप.नि. बालाजी लालपालवाले, पो.हवा. धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, मंगेश आदे, रितेश गेटमे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये