ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा झंझावाती दौरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

बुलढाणा लोकसभाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा नरेंद्र खेडेकर यांनी जिल्ह्यात झंझावाती दौरा सुरु केला आहे, आघाडी मधील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन काम करत आहेत. शुक्रवारी त्यांनी देऊळगाव राजा येथे भेट देऊन काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष विष्णु झोरे यांच्या निवासस्थानी झोरे परिवारच्या वतीने प्रा. खेडेकर यांचा शाल,श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला,काँग्रेस पक्ष नेते रमेश कायंदे ,शिवसेनेचे शहर प्रमुख गोविंदराव झोरे यांच्या निवासस्थानी सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गजानन काकड,शहर अध्यक्ष विष्णु झोरे,माजी नगरसेवक हनिफ भाई,आतिष कासारे,प्रा अशोक डोईफोडे, चव्हाण सर,गणेश आडे,नंदू शर्मा, आकाश कासारे,संतोष कासारे, प्रल्हाद माटोले, अयुब शहा,राजू बोराटे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे शहर अध्यक्ष विजय खांडेभराड,शिवसेनेचे तालुका प्रमुख दादाराव खार्डे,शहर प्रमुख गोविंदराव झोरे,पवन झोरे, वसंतराव खुळे, अजय शिवणकर,मोहन खांडेभराड,सुनील खेडेकर, नितीन देशमुख, पवन बोराटे,रमेश जगदाळे, तौसीक कोटकर,रमेश नागरे,राम बोराटे,उमाजी झोरे,संतोष खरात,व इतर उपस्थित होते.

महाआघाडी साठी यावेळी योग्य संधी मिळाली असून,सत्तारूढ पक्षाला मतदार कंटाळला असून परिवर्तन घडवून आणेल, त्याकरिता आघाडी मधील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे असे आवाहन प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये