ताज्या घडामोडी

चंद्रपुरात भिषण अग्नितांडव – ए टू झी बाजार आगीच्या विळख्यात

आजूबाजूच्या दुकानांना आगीचा धोका

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

भिषण आगीच्या घटनेने चंद्रपूर शहर हादरले असुन शहरातील गजबजलेल्या तुकुम परिसरात असलेल्या ए टू झी बाजाराला आज सकाळी 7:00 वाजताच्या सुमारास भिषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली असुन घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार आजची सकाळ शहरवासीयांसाठी  गंभीर आगीची वार्ता घेऊन आली असुन शॉर्ट सर्किट मुळे तुकुम भागात गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या गृह उपयोगी स्वस्त वस्तु मिळणाऱ्या  ए टू झी बाजाराला भिषण आग लागल्याचे लक्षात आले. ह्या परिसरात अनेक दुकाने तसेच हॉटेल असुन मागील अडीच तासापासून ही आग धुमसत आहे.

आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखुन अग्निशमन विभागाला कळविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न करत असुन वृत्त लिहीत पर्यंत आगीवर नियंत्रण मिळालेले नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये