ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्टेशन स्तरावर नविन कायदे अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

01/07/2024 लागू झालेले नविन कायदे संबंधाने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील 19 पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक ठाणेदार यांनी गावामध्ये तसेच शाळा कॉलेजमध्ये जावुन नविन कायदे अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रम राबविला व नविन व जुन्या कायद्याची तुलनात्मक माहीती विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक लोकांना दिली.

खरांगणा पोलीस स्टेशननी आंजी येथील कॉलेज मध्ये जावुन विद्यार्याना नविन कायद्याचे मार्गदर्शन केले तसेच खरांगणा मार्केट मध्ये ऑटो चालक व व्यापारी यांना नविन कायद्याची माहीती देवुन पत्रके वाटली. सिंदी पोलीस स्टेशन अंतर्गत विखणी येथील ग्राम पंचायत मध्ये तसेच केसरामल नगर विद्यालय नविन कायदे संबंधाने पोलीस पाटील व गावातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना नविन कायद्याची माहीती देण्यात आली. आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलावुन नविन कायद्याची माहीती नागरीकांना देण्यात आली. अल्लीपुर पोलीस स्टेशनला नागरिकांना नविन कायद्याबाबत माहीती देण्यात आली.

आर्वी पोलीस स्टेशन अंतर्गत गांधी विद्यालय, बस स्टैंड, तहसिल कार्यालय परिसर येथे जावुन नविन कायदयाची माहीती विद्यार्थी व लोकांना देण्यात आली. वर्धा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे.बी सायन्स कॉलेज व युनिक अकॅडमी वर्धा येथे नविन कायद्याची माहीती देण्यात आली. गिरड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशन स्तारावर नागरिकांना बोलावुन नविन कायद्याची माहीती देण्यात आली. सेलु पोलीस स्टेशन अंतर्गत आदीवासी आश्रम शाळा येथे नविन कायद्याची माहीती देण्यात आली. तळेगांव पोलास स्टेशन अंतर्गत गावागावात जावुन नागरिकांना नविन कायद्याची माहीती देण्यात आली, पुलगांव पोलीस स्टेशन अंतर्गत शासकीय आश्रम शाळा हिरापुर येथे नविन कायद्यासंबंधी माहीती देण्यात आली.

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फ जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला नविन कायद्याची जनजागृती करुन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेवुन नागरीक व विद्यार्थी यांना नविन कायद्याची माहीती देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये