ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ राष्ट्रीय महामार्गांवर नागभीड नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या खड्ड्यात अनेक अपघात

खड्डा जीवघेणा ठरत असतानाही प्रशासन आणि जणप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट

नागपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३डी वर गेल्या काही दिवसापासून खड्डा पडला आहे. याकरिता मुख्याधिकारी नगर परिषद, तहसीलदार नागभीड आणि डांबर ठेकेदार यांनी सदर खड्डा दुरुस्त करून देण्याची तजबी दाखविली मात्र याचंवेळेस बदली झाल्याने याकडे दुर्लक्ष झाले.

तसेच ज्या ठिकाणी खड्डा पडला आहे ह्या ठिकाणावर रेल्वे नवीन बांधकाम सुरु असल्याने अनेक ट्रक गौण खनिजाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरु आहे यामुळे सरळ येणाऱ्या वाहनधारकास खड्डा दिसत नसल्याने अनेक दुचाकी, ट्रक आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला पण प्रशासन आणि जणप्रतिनिधी यांनी याकडे दुर्लक्ष होतं असल्याने सदर खड्डा अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.

यावर आमचे प्रतिनिधी यांनी नवीन तहसीलदार वाघमारे साहेब यांचेशी यावर चर्चा घडवून आणि उद्या त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले यामुळे अपघात ठरणारा खड्डामुक्त होईल याकडे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये