ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंचशील मंडळ द्वारा संचालित प्रज्ञा विकास वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव

२६ ते २७ जानेवारीला मिलिंद नगर येथे होणार साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                पंचशील मंडळ भद्रावती द्वारा संचालित प्रज्ञा विकास वाचनालयाचा दि.२६ व २७ जानेवारीला प्रज्ञा विकास वाचनालय मिलिंद नगर शिवाजीनगर येथे सुवर्ण महोत्सव करण्याचे ठरविण्यात आले आहे.

          शुक्रवार दि.२६ जानेवारीला प्रज्ञा विकास वाचनालयाचे प्रांगणात सकाळी ७ वाजता ध्वजारोहण, सकाळी ९ वाजता ग्रंथ प्रदर्शनी व समाजात ग्रंथालयाचे महत्त्व या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक गोवर्धन तर ॲड. भूपेंद्र रायपुरे , प्रा.डॉ. राजेंद्र पाटील हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.सायंकाळी ६ वाजता पंचशील भवन पंचशील नगर येथे शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुनेश्वर गौरकर हे राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून अशोक जवादे, राजेंद्र पाटील नामदेव रामटेके हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

     शनिवार दि.२७ जानेवारीला प्रज्ञा विकास वाचनालय येथे सकाळी १०: ३० वाजता सुवर्ण महोत्सव सोहळ्याचा उद्घाटन सोहळा घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ अनिल बोरगमवार यांचे अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.याप्रसंगी रत्नाकर नलावडे सहाय्यक ग्रंथालय संचालक नागपूर, रत्नरक्षित शेंडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रपूर , मुनेश्वर गौरकार अध्यक्ष पंचशील मंडळ, अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष , बिपीन इंगळे ठाणेदार भद्रावती, डॉक्टर विशाखा शेळकी मुख्याधिकारी नगरपरिषद भद्रावती ह्या उपस्थित राहतील.

    दुपारी १ वाजता स्नेहभोजन , दुपारी २ वाजता ग्रंथालयाच्या वाढत्या समस्या आणि शासनाची उदासीनता या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे अध्यक्ष अनिल बोरगमवार माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ , मुख्य मार्गदर्शक म्हणून रवींद्र रत्नपारखी विस्तार अधिकारी पंचायत समिती राजुरा, किशोर देवगडे ग्रंथपाल लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती हे राहतील.तरी होऊ घातलेल्या या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रज्ञा विकास वाचनालय मंडळाद्वारे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये