ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुतार समाजाने बदलत्या काळाबरोबर बदलले पाहिजे – प्रा. प्रकाश बगमारे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी तालुका अखिल सुतार समाज मंडळ ब्रह्मपुरी च्या वतीने नुकतेच दुर्गा मंगल भवन येथे समाजाचे स्नेहसंमेलन संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री विजय शास्त्रकार होते तर उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष रीता उराडे व सह उद्घाटक म्हणून येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री लक्ष्मीकांत लाडुकर उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा ओबीसी मोर्चा लोकसभा प्रमुख तथा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ब्रह्मपुरी विधानसभा संयोजक प्रा प्रकाश बगमारे उपस्थित होते.

याप्रसंगी आष्टी जिल्हा गडचिरोली येथील प्राचार्य रवी शास्त्रकार अतिथी म्हणून उपस्थित होते अनेक समाज बांधवांचे उपस्थितीत हे स्नेह मिलन संपन्न झाले याप्रसंगी मान्यवरांनी समाज संघटना आणि शिक्षणातील प्रगती आणि व्यवसायासमोरील संकटे यांचा सविस्तर ऊहापोह केला व समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम भगवान विश्वकर्मा, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना प्रा प्रकाशजी बगमारे यांनी भारत सरकारच्या अतिशय लोकप्रिय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती सविस्तरपणे दिली व समाज बांधवांनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन केले त्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतील व पाठपुरावा करण्याचे कार्य या योजनेचे संयोजक म्हणून आपण करू असे आश्वासन प्रा प्रकाश बगमारे यांनी दिले. एवढेच नव्हे तर सध्याच्या काळात सुतार समाजावर काही संकटे येत आहेत.

त्या संकटात आपण आपल्यामध्ये असलेल्या आपल्या कौशल्यामध्ये आवश्यक बदल घडवून आणून बदललेल्या परिस्थितीत आपले स्किल पुन्हा विकसित करावे अशी विनंती व सूचना सुतार बांधवांना केली आणि आपण सदैव या समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. या प्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते,गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय शास्त्रकार,सोमेश्वर पोटेकर, गुरुदेव वांढरे, नामदेव शास्त्राकार, पुरुषोत्तम रासेकर व अन्य समाज बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले.या प्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजपा नेते गडचिरोली चिमूर लोकसभा ओबीसी मोर्चा प्रमुख तथा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ब्रम्हपुरी विधानसभा संयोजक प्रा प्रकाश बगमारे यांचा सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये