ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन महोत्सव उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

-संत गजानन महाराज मंदिर देवस्थान थुट्रा, येथे संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात हभप चरणदास कपोहीनकर महाराज,हभप विनायक धाबेकर महाराज आणि सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी उपस्थित भाविक भक्त बांधवाना मार्गदर्शन केले.

यावेळी मंदिर सेवक भास्कर बावणे व महादेव चपरे उपस्थित होते या प्रगट दिन महोत्सवात सकाळी संत गजानन महाराज यांची पालखी,मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत परिसरातील विविध गावांतिल भजन मंडळी सहभागी झाली होती हभप चरणदास महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.

विनायक धाबेकर महाराज यांनी भजन सादर केले तर सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले घटस्थापना,महाराजांची आरती, दहीहंडी काला व महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला. प्रगट दिन महोत्सव सोहळ्यात पदाधिकारी व मोठया संख्येने या परिसरातील भक्तगण महिला मंडळ,पुरूष मंडळाचे भजन मंडळी सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये