ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री महर्षी विद्या मंदिर चंद्रपूर येथील खेळाडू कु. दिव्यांका राजेश दुर्गे व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम

खेळाडूचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन

चांदा ब्लास्ट

व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या द्वारा संलग्नित नुकताच झालेल्या महाराष्ट्र इंटर स्टेट झोन मिनी व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ रोजी वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धेत नागपूर झोन मुलींच्या संघाने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला या संघात श्री महर्षी विद्या मंदिर चंद्रपूर ची विद्यार्थिनी कु. दिव्यांका राजेश दुर्गे या खेळाडूने खेळाचे उत्तम प्रतिनिधित्व करून चंद्रपूर जिल्ह्याचे व आपल्या शाळेचे नावलौकिक केले.

या खेळाडूचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. सदर खेळाडूला मार्गदर्शक म्हणून शाळेतील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख दिनेश कोयचाडे, रुपेश बोडे, नितेश क्षीरसागर, रुचिता आंबेकर, पायल ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पुरस्कार प्राप्त खेळाडू वर्धा येथून शाळेत परतल्या नंतर गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक, सचिव श्री. दत्तात्रय कंचर्लावार यांच्यासह सर्व सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. श्रीलक्ष्मी मूर्ती आणि उपमुख्याध्यापिका श्रीमती. निशा मेहता तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये