ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन

सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य स्पर्धा हा उत्तम मार्ग

चांदा ब्लास्ट

नृत्य ही चौसष्ठ कलापैकी असलेली एक कला आहे. नृत्यातुन आपण आपल्या भावनांची अभिव्यक्ती करू शकतो. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य स्पर्धा हा उत्तम मार्ग आहे. हाच उद्देश लक्षात घेता चांदा पब्लिक स्कूल येथील पुर्व प्राथमिक विभागात एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संखेने विद्यार्थी सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पाहुणे नम्रता बदकेलवार, शाळेच्या संचालिका, मुख्याध्यापिका व पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. मुलांनी आपल्या नृत्याला अनुसरून वेशभुषा केली होती. विद्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण पाहुण उपस्थित परिक्षक व शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी मुलांचे तोंडभरून कौतुक केले.

शाळेच्या प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी नृत्य स्पर्धेत मुलांना भाग घेण्यासाठी प्रेरित करणा-या पालकांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका पुजा मिश्रा व मंजुश्री नवरखेले यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका दुर्गावती यादव यांनी केले. उत्कृष्ठ विजेता व पारितोषिक वितरणाचे कार्य परिक्षकांनी केले. ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरित्या पार पडली आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपले मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये