मौजा नागठाणा अॅस्यावर सिटी भाग 2 येथील प्लॉट घोटाळ्यातील आरोपी गजाआड
सावंगी पोलीस स्टेशनची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून, गुन्हयातील नमुद शेत सर्व क्र. 67 चे मालक आरोपी क्र. १) दिनेश महादेव सराटे वय 48 वर्षे रा. नागठाणा ता.जि. वर्धा, शेत सर्वे क्र. 65/1 चे मालक आरोपी क. 2) रश्मी मोतीराम गेडाम च. नागठाणा यांचे नावावर असलेली शेत जमिन ही आदीवासी धारकाची जमीन असुन सदर जमीनीची विक्री होत नसतांना सुद्धा यातील नमुद आरोपी क. 03) राकेश संतोष खैरकार वय 38 वर्षे रा. लुबीनी नगर, पुलगाव जि. कर्चा व (4) यश संतोष सौरकार वय 45 वर्षे रा. लुंबीनी नगर पुलगाव जि. वर्धा यांनी शासनाची कुठलीही परवानगी नसतांना मा. उपविभागीय अधिकारी सा. वर्धा यांचे स्वाक्षरीचा बनावटी व खोटया सही शिक्याचा आदेश बनवून त्यानुसार जमिनीवर लेआउट टाकून ग्राहकांना आरोपी क्र. 5) विनोद गुलाबराव ठाकरे रा. पुलगाव याने किस्ती मासिक दराने तसेच इतर प्लॉट धारकांचे विसारपत्र करून दिले. त्याच प्रमाणे फिर्यादी यांना घटनास्थळ शेत सर्वे क्र 67 मध्ये प्लॉट क्र 45 मधील 979.16 स्क्वेअर फुट प्लॉटचे एकूण 48,000 रू. मध्ये घटना तारीख व वेळी विक्री करून दिली. सदर लेआउट मधील एकुण 24 प्लॉट धारकांना 31 प्लॉट सरासरीमध्ये अंदाजे 31,00,000 रू. कये विकुन यातील नमुद फिर्यादी व प्लॉट धारकांचा बनावटी लेआउटची मंजुरी तयार करून सदर बनावटी दस्तएवजाचा बापर शासकिय कार्यालयात करून नमुद आरोपीतांनी संगणमताने प्लॉट धारकांची दिशाभुल करून फसवणुक केली अशा फिर्यादीच्या तोडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करून तपास सुरु आहे.
सदरचा गुन्हा दाखल होताच सावंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. संदिप कापडे, यांनी सदरच्या गुन्हयाचा तपास स्वतः कडे घेवुन 24 तासाच्या आत गुन्हयातील दोन मुख्य आरोपी नामे 1) राकेश संतोष सौरकार वय 38 वर्ष रा. लुबीनी नगर, पुलगाव जि. वर्धा व (2) यश संतोष खैरकार यय 45 वर्षे रा. लुबीनी नगर, पुलगाव जि. वर्धा व आरोपी क्र. (3) दिनेश महादेव सराटे वय 48 वर्षे रा. नागठाणा ता.जि. वर्धा, यांचा शोध घेवुन त्यांना सदर गुन्हयात अटक केली. गुन्हयातील अटक आरोपीतांचा मा. विदयमान कोर्टातुन दिनांक 06/03/2025 पावेतो पिसिआर घेण्यात आला असून, सदर आरोपीतांनी सदर लेआउटमध्ये 50 ते 60 लोकांची फसवणुक केल्याचे निदर्शनास येत आहे. पुढील तपास संदिप कापढे, सहा. पोलीस निरीक्षक, ठाणेदार सावंगी मेघे करीत आहे. यातील अटक आरोपी नामे राकेश संतोष खैरकार याचे विरुद्ध विविध पोलीस स्टेशनला सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, स.पो.नि. श्री. संदिप कापडे, पोलीस स्टेशन, सावंगी मेघे यांचे मार्गदर्शनात पाडेपनि उमाकांत राठोड, स्था.गु.शा. वर्धा, नबी शेख, पोहवा संजय पंचभाई, सतिश दरवरे, पोहवा सचिन घेवंदे यांनी केली आहे.