ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात रक्तदान शिबिरामध्ये 50 रक्त दात्यांनी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र चार्य जी महाराज यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात दिनांक 25-फेब्रुवारी ला ठीक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते देऊळगाव राजा शहरातील त्यांच्या भक्तांनी नगरपरिषद सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे श्री स्वामी नरेंद्र चार्य जी महाराज यांनी त्यांच्या शिष्यांना आदेश देऊन संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे सूचित केले होते.

त्यानुसार ठीक ठिकाणी रक्तदान शिबीरे घेण्यात आली जवळपास 85000 रक्त बॉटल एका दिवसात संकलित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे देऊळगाव राजा शहरांमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला यामध्ये तीन महिलांनी सुद्धा रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला जालना येथील श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर च्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दशरथ राठोड, मंगेश मोठे, गणेश तिडके, सुरेश शिंगणे, रवी कोरडे, राजू भावसार, संजय कोरडे, सौ सुनीता शिंगणे, सौ मंगलाबाई शिंगणे, यमुनाबाई शिंगणे, संगीता शिंगणे, छाया कोरडे,स्वातीताई, उज्वला वाघमारे,कांता टेंभूरकर,गणेश बोराटे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये