ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनाची जिद्द आणि इच्छा माणसाला चिरतरुण ठेवते वय हा फक्त आकडा

चंद्रपूर हास्य क्लबचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

चांदा ब्लास्ट

वय हा फक्त आकडा असतो, मनाची जिद्द आणि इच्छा हीच माणसाला चिरतरुण ठेवते याचे सुंदर प्रत्यय आझाद गार्डन येथील हास्य क्लब मेंबर्स जे की ६०-९० च्या वयोगटातील आहेत, यांनी दाखवून दिला.

आज IMA हाल इथे झालेल्या वर्धापन दिनाच्या रंगारंग कार्यक्रमात आझाद गार्डन हास्य क्लब सभासदांनी उत्स्पृत्पणे सहभाग घेवून, वाढत्या वयाची व्याख्या बदलून टाकली.

आझाद गार्डन चंद्रपूर येथे हास्य क्लब ची सुरवात २००१ साली श्रीमती शोभा कछवाह आणि श्री कमलसिंह कछवाह यांनी केली. आज या क्लब मधे वयोगट ६० ते ९० वर्षाचे वयोवृद्ध १०० च्या अधिक आहेत. आणि हे सगळे वृध्द तब्येतीने तंदुरुस्त आहेत. इंटरनॅशनल हास्य क्लब चे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी हास्य क्लब ची सुरवात भारतातून करून आज जगभरातील १३२ देशात हास्य क्लब च्या शाखा चालवत आहेत. हास्यमुळे मेंदुंमधे फील गुड रसायन तयार होऊन, मन आणि शरीर तंुरुस्त राहते.

श्री कमलसिंग काचवाह यांच्या नेतृत्त्वात हा रंगा रंग कार्यक्रम घेण्यात आला. यात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रुची कछावाह,डॉ नंदाली विश्वास झाडे मॅम आणि राधा ताई पत्तीवार होत्या. स्वरस्वती पूजन तसेच मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सर्वात करण्यात आली.

 हास्य क्लब सभासदाद्वारे श्रीमती शोभा काछवाह आणि श्री. कमल सिंग काछ्वाह यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच हास्य क्लब मधे हास्य डान्स ची सुरवात करणारे श्री मंगेश खोब्रागडे यांचे सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी लागणारे बक्षिस श्रीमती सोनाली खोब्रागडे यांचे कडून देण्यात आले होते. संचालन श्रीमती पुनम शर्मा आणि श्रीमती ईशा दुर्योधन यांनी केली.

कार्यक्रमाचे व्यवस्थापनासाठी पंकज शर्मा, टिळक ठाकूर, पुनम शर्मा, सोनाली खोब्रागडे ,ईशा दुर्योधन, अमृता गावंडे आणि ईतर यांनी मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये